विधानसभेची निवडणूक पार पडली यामध्ये सत्ताधारी महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक काळात प्रभागातील निवडणुकीची तयारी करणाऱ्या माजी प्रशासक नगरसेवकांसह इच्छुकांना महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले आहे. जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे लागलेले आहे. सरकार सत्तेत आरुढ होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घोषित करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
दरम्यान, सन २०२२ मध्ये इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाने इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. यंदा प्रथमच महापालिकेची पहिली निवडणुक होत आहे.. त्यामुळे पहिल्या सभागृहात पाऊल ठेवण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.