आमदार गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले ब्रह्मानंद पडळकर यांचा सत्कार खानापूर नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे, गटनेते मारुती भगत, माजी नगरसेवक भाऊसो मंडले, युवानेते अजित पवार, युवा नेते सागर माने व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला.
संपतराव नाना माने यांच्या पश्चात खानापूर घाटमाथ्याची वाट लागली आहे. खानापूर घाटमाथ्याचा काहीजणांनी बाजार मांडला आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात हा बाजार उठविण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खानापूरकरांच्या पाठीशी आमदार गोपीचंद पडळकर आणि मी साम-दाम दंड भेद या नितीने खंबीरपणे उभा राहणार आहे. खानापूर नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांना निधी पडू कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी व्यक्त केला.
