वस्त्रोद्योगाला चालना…..

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगासाठी सुमारे 1हजार 952 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यात 18 ठिकाणी लघु वस्त्रोद्योग संकुल उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यामुळे अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच अलीकडच्या काळामध्ये अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याने साडी उद्योगालाही बळकटी मिळणार आहे.

अर्थसंकल्पाकडे विशेषतः इचलकरंजीकरांचे लक्ष लागून राहिलेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर पुढील दोन दिवस विधानसभेमध्ये त्यावरती चर्चा देखील होणार आहे. त्यामुळे धोरणांबाबतअद्याप पूर्ण बाबत स्पष्टता झालेली नाही.

मात्र मंदीतील वस्त्रोद्योगाला चालना मिळावी यासाठी सुमारे 125 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येण्यासारखे राज्यात 18 ठिकाणी लघु वस्त्रोद्योग संकुलाची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल दोन हजार कोटींच्या घरात गुंतवणूक होणार आहे.