माझ्या विजयात रविंद्र माने यांचा मोठा वाटा : आम. अशोकराव माने

केवळ इचलकरंजी आणि शिरोळ विधानसभेच्या विजयातच नाही तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील माझ्या दैदीप्यमान विजयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचा मोठा वाटा आहे असे गौरवोदगार नवनिर्वाचित आमदार अशोकराव माने यांनी काढले. माझ्या विजयासाठी झटणाऱ्या शिवसेनेचे मी – मनःपूर्वक आभार मानतो अशी कृतज्ञता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर नूतन आमदार अशोकराव माने यांनी
कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची मातोश्री भवन, इचलकरंजी येथे भेट घेतली व निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे आभार मानले. यावेळी शहर शिवसेनेच्या वतीने आमदार अशोकराव माने यांचा शाल- पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने म्हणाले, हातकणंगले तालुक्यातील दोन्ही मतदारसंघात विकासाची गंगोत्री आणण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करूया. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, इचलकरंजी शिवसेना शहरप्रमुख माजी उपनगराध्यक्ष रवीसाहेब रजपुते, माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, दलितमित्र काकासाहेब माने संस्थेचे चेअरमन अमरसिहं माने, कोल्हापूर शिवसेना जिल्हा संघटक मोहन मालवणकर, कोल्हापूर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, कोल्हापूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, विजय पाटील, उत्कर्ष सूर्यवंशी, संदिप माने, दीपक पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.