चौंडेश्वरी महिला नागरी पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

श्री चौंडेश्वरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या चेअरमन सौ. स्मिता सातपुते व व्हा.चेअरमन सौ. उज्वला कबाडे यांनी स्वागत केले. श्री. व सौ. अनिता विजय बारवाडे यांच्या उपस्थितीत सत्यनारायण पुजा बांधण्यात आली. यावेळी कुमार तात्यासो कबाडे यांची श्री चौंडेश्वरी सुतगिरणीच्या व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

वर्धापन दिन कार्यक्रमास महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सातपुते, सुकाणू समितीचे सर्व सदस्य, श्री देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे व विश्वस्त, श्री चौंडेश्वरी सुतगिरणीचे चेअरमन संजय कांबळे व संचालक, श्री चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन महेश सातपुते व संचालक, श्री चौंडेश्वरी महिला समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षा सौ. दिपा सातपुते व त्यांचे सहकारी, युवती फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्मिता बुगड व त्यांचे सहकारी, दि. रामलिंग को – ऑप सोसायटीचे व्हा.चेअरमन भाऊसो साखरे व संचालक, बँका व पतसंस्थांचे अधिकारी, संचालिका व सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन श्रीमती मुमताज कोतवाल यांनी केले.