इंगळी गावातील पूरबाधित नागरिकांना समुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळावे याकरता इंगळी गावचे शिवसेना शहर प्रमुख केशव पाटील व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत सानुग्रह अनुदान लवकरात लवकर कुटुंबांना मिळावे तसेच सानुग्रह योजनेची बनविताना झालेल्या त्रुटी दूर करून नवीन यादी बनवून सदरील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्याने सुपूर्द कराव्यात याकरिता मा. आ.डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी अप्पर तहसीलदार, मंडल अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांना सूचना दिलेल्या आहेत.
हातकणंगले तालुक्यातील इंगळीतील बाधितांना मिळणार न्याय
