आता लसणाची फोडणी महागली! आवक घटल्याने इतकी झाली भावात वाढ

वाढत्या महागाईने सर्वचजण खूपच त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचेच बजेट कोलमडले आहे. प्रत्येक महिन्याला गृहिणींचे बजेट कोलमडत असते. कधी गॅस सिलिंडरच्या भावात वाढ होते तर कधी सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तू महागतात. अशातच कांदा, टोमॅटोनंतर आता लसूणने देखील सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.किरकोळ बाजारात आवाक कमी झाल्याने जास्तीचे पैसे देऊन खरेदी करावा लागत आहे.मागच्या सहा महिन्यापासून बाजारात लसणाची आवक कमी झाली आहे. उत्पादन कमी असल्याने लसणाच्या भावात वाढ होत होती. गेल्या आठवड्यापर्यंत लसूण २०० रुपये प्रतिकिलो भावाने मिळत होता.

या आठवड्यात लसणाच्या (Garlic) भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सध्या ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो लसूण बाजारात (Market) विकला जात आहे. आजपर्यंतचा सर्वाधिक लसणाचा वाढलेला भाव आहे.

मागील दोन वर्षात लसणाचे भाव खूपच कमी झाले होते. त्यामुळे बाजारात ५० ते ६० रुपये (Price) दराने मिळत होता. भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांनी लसणाचे उत्पादन थांबवले. त्यामुळे लसणाची कमतरता बाजारात जाणवायला लागली.लसणाच्या लहान पाकळ्या असलेल्या काहीशा सुकलेल्या लसणाचा भाव प्रतिकिलो १५० रुपये होता. मध्यम आकाराच्या लसणाला प्रतिकिलो २०० रुपये भाव मिळाला तर सर्वांत चांगला भाव हा मोठ्या पाकळ्या असलेला लसूण ३५० रुपये किलो या भावाने विकला गेला आहे.