कृष्णा नदीवरील नवीन पुलाची प्रतीक्षा

रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पूल उभारणीचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. जुन्या पुलाजवळ समांतर व उंच पूल उभारला जात आहे. या नवीन पुलामुळे रहदारी सुखकर होण्याबरोबरच गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेठरे बुद्रुकच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसह नवीन पुलासाठी निधी आणला आहे. या पुलाच्या पूर्णत्वाची परिसरातील लोकांना प्रतीक्षा लागली आहे.