खर्च सादरीकरणास विलंब! निवडणूक विभागाला उमेदवारांची प्रतीक्षा….

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणूक लढवलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपला निवडणूक खर्च निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत १३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. या निवडणुकीत डॉ. राहुल आवाडे यांनी विजय मिळवून यशस्वी उमेदवार ठरले आहेत. मात्र, निवडणुकीच्या निकालाला १० दिवस उलटूनही बहुतांश उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचा अंतिम हिशोब निवडणूक विभागाकडे सादर केलेला नाही. 

खर्चाच्या ताळमेळासाठी विभागाचे कर्मचारी आणि अधिकान्यांना सध्या उमेदवारांकडून हिशोब प्राप्त होण्याची वाट पाहावी लागत आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेची अंतिम टप्प्याची पूर्तता रखडत आहे. अनेक उमेदवार कामावरही परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, निवडणूक खर्च सादर करण्यासाठी एक महिना कालावधी उपलब्ध असूनही काही उमेदवार हा तपशील वेळेआधी सादर करण्यास उदासीन आहेत.

निवडणूक विभागाकडून झालेल्या खर्चाचा हिशोब सादर करण्यात विलंब करत आहेत. यामध्ये जाहिरात प्रचार मोहीम, बाहन खर्च, प्रचार साहित्य, आणि कार्यकर्त्यांसाठीचे व्यवस्थापन अशा विविध खर्चाचा समावेश आहे. खर्चाचा तपशील वेळेत सादर करणे शक्य असतानाही उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने निवडणूक विभागाच्या उमेदवारांना वेळेत खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इचलकरंजीत निवडणूक प्रक्रियेची तांत्रिक पूर्तता लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी विभाग प्रयत्नशील असून उमेदवारांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. वेळेत सादरीकरण झाल्यास निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक ठळकपणे दिसून येईल.