इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत आतापासूनच कार्यकर्त्यांनी ठेवली स्वबळाची तयारी

कोल्हापूर जिल्ह्यात दोन महापालिकांच्या निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेची यंदा पहिल्यांदा निवडणूक होणार आहे. एप्रिल ते मे महिन्यात या निवडणुकीचा धुव्वा उडणार आहे. अशातच इचलकरंजीच्या नव्या आमदाराची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. महाविकास आघाडी येणारी महापालिका एकत्र लढवणार असून महायुतीमध्ये सध्या तरी बेबनाव आहे. त्यामुळे इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. इच्छुकांनी सर्वोतोपरी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने एकत्रपणे या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. तर महायुतीमधील विस्कटलेली घडी पाहता भाजप शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महापालिकेच्या निवडणुकीवरून बेबनाव असल्यामुळे आतापासूनच सर्वच कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे.