अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी आज प्रभाग २१ लालनगर, नेहरूनगर, वेताळ पेठ वखारभाग, गांधी कॅम्प, सरस्वती मार्केट या परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला महिला, कार्यकर्ते, युवक, युवती अशा सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विठ्ठल चोपडे यांनी या परिसरात सकाळी पदयात्रेस प्रारंभ केला.
घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिला. महिलांनी पाण्याची समस्या मांडून हा प्रश्न सोडवण्याचे वचन विठ्ठल चोपडे यांच्याकडून घेतले. विठ्ठल चोपडे यांनीही पाणी प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पदयात्रेत माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे, माजी शिक्षण मंडळ सभापती तोफिक मुजावर, माजी नगरसेविका बिल्कीस मुजावर, अर्जुन जावळे, सुखदेव लोकरे, नागेश क्यादगी, बाबासाहेब कोरवी, मारुती कोरवी,
फरहान मुजावर, सुभान आलासे, अस्लमचौगुले, अर्जुन जावळे, सुखदेव लोकरे, युवराज लाखे, अनिल वासुदेव, अण्णाप्पा बोते, सतीश लोकरे, सुरेश धुमाळ, रवी कांबळे, सचिन बुचडे, राहुल कांबळे, संजय गोसावी, ममता शिकलगार, रवी पाटोळे, अनिल वासुदेव, वंदना कोरवी, जया कोरवी, आकाशाबी कोरवी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.