विटा(vita) वन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानामुळे विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, परिणामी योजनांना अधिक गती मिळेल,अशी अपेक्षा आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली.
राज्य कॅम्प योजनेंतर्गत खानापूर येथील वन अधिकाऱ्यांच्या निवास स्थानांच्या विविध इमारतीचे भूमिपूजन आ. बाबर यांच्याहस्ते झाले. त्यावेळी जिल्हा परिषदेची माजी सदस्य पांडुरंग डोंगरे , नगराध्यक्षा जयश्री मंडले, उपनगराध्यक्षा मेघा हिंगमिरे, माजी नगराध्यक्षा सुमन पाटील, बांधकाम सभापती सुनील मंडले,पाणीपुरवठा सभापती चंदना भगत, वनपाल राजेंद्र पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे आदी उपस्थित होते.
राज्य कॅम्प योजनेअंतर्गत वन विभागातील अधिकाऱ्यांच्यासाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये वनपाल , वनरक्षक , खानापूर आणि वनरक्षक बलवडी या निवासस्थानांचा समावेश आहे, असेही आ. बाबर यांनी सांगितले .
यावेळी लालासाहेब पाटील,प्रकाश जोशी.बबनराव माने, शिवसेनेचे दादा भगत,हर्ष माने, बलराज माने, बाळासाहेब धेंडे उपस्थित होते. फिरोज शिकलगार , शीतल मांगले,प्रतिमा मांडले, शशिकला पाटील , दगडू क्षीरसागर, ए.के. खापरकर यांनी संयोजन केले.
