आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे चोरट्याने धुमाकूळ कालच एकाच रात्री पाच ठिकाणी घरपोडी करत दोन ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्व चोऱ्यांमधून 800 g चांदी, सुमारे तीन तोळे सोने व रोग रक्कम 35 हजार असा ऐवजी रंपास केला. तर एका शॉपी व फुटवेअर शॉपी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. याबाबत आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
चोरट्यांनी दिघंची नळ मळा येथे महेंद्र मोरे यांच्या घरातील चांदीचा गणपती व इतर वस्तू असे एकूण आठशे ग्रॅम चांदी नऊ ग्रॅम सोने व रोख 14000 असे सुमारे दीड लाखावर ऐवज लंपास केला. तर लवकुमार बाबर यांच्या घरचा दरवाजा उचकटून 15000 रुपये रक्कम लंबाच केली विष्णू मैत्री यांच्या किराणा दुकानातील दहा हजार रुपये लंपास केले. तर अहमदनगर यांच्या घरातून चांदीचे दागिने लंपास केले तर भीमराव रणदिवे यांच्या मुलीचे गंठण लंपास केले तुषार भोसले, राज अत्तार व गणपती शिंदे यांच्या घरातील अयशस्वी प्रयत्न केला.