डॉ. नितीन धवणे- पाटील यांना महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येणारा यावर्षीचा “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार” २०२४ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. डॉ. नितीन धवणे- पाटील यांनी चित्रपट, सांस्कृतिक, दिग्दर्शन व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व भरीव योगदान दिल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती डॉ. दिपक जाधव यांच्या कडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे.
टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने डॉ. नितीन धवणे- पाटील यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजन पुणे येथे रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य प्रायोजक ही डॉ. नितीन धवणे- पाटील आहेत. या सोहळ्यात साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व राष्ट्रभक्तीने प्रेरित होवून समाजऋण फेडणा-या तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव व भान ठेवून कार्य करणा-या व्यक्तींचा या सोहळ्यात सुप्रसिध्द अभिनेत्री आर्या घारे, मा. श्री. नितिन धवने- पाटील, मा. श्री. शेखर गायकवाड सर ( महाराष्ट्राचे साखर आयुक्त) यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना ही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. नितीन धवणे- पाटील यांना चित्रपट, सांस्कृतिक, दिग्दर्शन व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. तसेच ते संस्थापक चे आहेत. तसेच ते प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे आहेत. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानचिन्ह, शाल, फेटा असे आहे. तसेच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक, ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या कडून शुभेच्छा देण्यात येत आहेत व त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बार रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी पत्रकार भवन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ पुणे या ठिकाणी पार पडणार आहे. अशी माहिती डॉ. दिपक जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.