सांगोला शहरातील सामाजिक कार्यकर्ते सोनार समाज (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष (मातोश्री प्रतिष्ठान) सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष, उद्योगपती अक्षय भैय्या महामुनी यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयापासून मोटार सायकल व चार चाकी वाहनांची भव्य रॅली काढण्यात आली. रॅली संपन्न झाल्यानंतर जाहीर प्रवेशाच्या कामाची सुरुवात झाली. यावेळी महामुनी यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याशिवाय तालुक्याला पर्याय उरला नाही त्यामुळे त्यांनी या तालुक्याचे नेतृत्व करावे आम्ही सर्व खंबीरपणे आबांच्या पाठीशी उभे राहू असे मत मा. अक्षय महामुनी यांनी व्यक्त केले.