खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुहास भैया बाबर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपली चुणूक दाखवली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या कामाचे कौतुक करताना ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तींचे उदाहरण दिले. मतदारसंघात झालेली कामे, वैशिष्ट्ये सांगताना ग. दि. माडगूळकर यांच्या कवितेचा दाखला देत पहिल्याच अधिवेशनात आमदार सुहास भैया बाबर यांचा आवाज घुमला.
सभागृहात बोलताना आमदार सुहासभैया बाबर यांनी एका नवख्या आमदाराला बोलण्याची संधी आपण दिली याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले. ते म्हणाले, राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे सरकारचा पुढील काळातील प्लॅन असतो. आमच्या सरकारचे आणि मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे कोणत्या नजरेतून कोण कसे पाहतो याला माझ्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. तर आमदार म्हणून या सुहास बाबरचा विधानसभेतील कामकाजाचा श्री गणेशा होत असताना या तिन्ही नेत्यांकडे पाहताना माझ्या मनात भावनांचे एक काहुर माजले आहे.
विधिमंडळात पहिल्यांदा बोलताना मनातल्या भावना ओठावर आल्याच पाहिजेत असेही बाबर म्हणाले.ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी जयंती साजरी झाली. मी दत्तदर्शनाला ठिकठिकाणी गेलो आणि त्याचवेळी कानावर एक अभंग ऐकू आला. कदाचित आपण सर्वांना माहीतच असेल ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला ते दत्तगुरु दिसले अशा त्या ओळी होत्या. मी सहज या ओळीचा अर्थ पाहिला तर ब्रम्हा म्हणजे निर्माते, विष्णू म्हणजे रक्षणकरते तर महेश म्हणजे संहारक असा अर्थ निघाला. माझ्या दृष्टीने सरकारचे निर्माते, जनतेचे रक्षण करते आणि दृष्ट प्रवृत्तीचे संहारक असे आमच्या या तिन्ही नेत्यांचे वर्णन करावे लागेल