विधानसभा निवडणुकीत विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली तरी त्यांचे पद इतरांना दिले नाही. यावरून पक्षातील त्यांचे स्थान आणि राजकीय वजन लक्षात घेत ते आगामी काळात राष्ट्रवादीसोबत राहणार की आणखी कोणत्या निर्णय घेणार हे समजणार आहे. तसेच पक्षालाही त्यांच्या संदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
महाविकास आघाडीमधील एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. हा महाविकास आघाडीला धक्का असला तरी आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी हा प्रवेश होणार असून येत्या काही दिवसात त्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झालेली आहे.