तासगाव तालुक्यात भानामतीचा प्रकार! शाळकरी मुलांत भीतीचे वातावरण

सतत काही ना काही भानामतीचा प्रकार उघडकीस येत असतात. निंबळक, बोरगाव, चिखलगोठण (ता. तासगाव) या तीन गावांच्या तिट्टयावर कुणीतरी अज्ञाताने अमावस्येच्या पूर्वसंध्येला सुप, दुरडी, लिंबू, घटना गंभीर नारळ, लवंग, मिरे, काळे कापड, तपास करावी हळदी कुंकू अशा भानामती करण्याच्या वस्तू टाकल्या आहेत.त्यामुळे लोक घाबरले तसेच शाळकरी मुले बिथरली. परिणामी अंनिसचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी सामूहिकरित्या या सर्व वस्तूंचे दहन करून टाकले.

यावेळी शिक्षक पांडुरंग महाडिक, सुंदरनाथ पाटील, किरण, निकम, शंकर सोमदे, किरण पाटील, अधिकरावसाळोखे, अनिल पाटील, अक्षय पवार, महादेव पवार आदी प्रमुख उपस्थित होते. गेले काही दिवस अमावस्या, पौर्णिमा, बुधवार, शनिवारी या दिवशी या तिट्ट्यावर लोकांच्या नजरेला पडतील अशा ठिकाणी या वस्तू टाकल्या जातात हा भानामतीचा प्रकार, अशी चर्चा होते.