खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुकडीत २२ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसा निमित्त प्रधानमंत्री जनआरोग्य समिती सदस्य अमित रणनवरे, आरोग्य मित्र मोहसिन मुल्ला व महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तप- सणी शिबीर रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी रुकडी येथील प्राथमिक आरोग्य पथक या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या शिबिरात मेंदू रोग, हृदय रोग, मुत्रविकार, पोटविकार, अस्थिरोग ( हाडाचे व मणक्याचे रोग ), नेत्ररोग इत्यादी व्याधींवर पल हॉस्पिटल,अथायू हॉस्पिटल, स्वस्तिक निरामय हॉस्पिटल, सेवासदन हॉस्पिटल, नंदादिप हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. तर शस्त्रक्रियेची गरज भासल्यास प्रधान मंत्री जनअ- रोग्य व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेची ही व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रक्तातील साखरेची तपासणी, व इ.सी. जी.व प्रधान मंत्री जनआरोग्य व आयुष्यमान कार्ड सुद्धा पुर्णपणे मोफत काढून देण्यात येणार आहे.

रुकडी गावासह पंचक्रोशीतील जास्तीत जास्त रुग्ण ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्धी माध्यमांद्वारे संयोजकांमार्फत करण्यात आले आहे. दरम्यान या पत्रकार परिषद प्रसंगी डॉ. पी. एस. दातार ( तालुका आरोग्य अधिकारी ), डॉ. राहुल देशमुख ( वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य पथक रुकडी. ) डॉ. धनंजय महाडीक ( वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हेर्ले.), अनिल उपाध्ये ( महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष ), सर्व आशा वर्कस्, आरोग्य सेवक सेविका, गट प्रवर्तक तसेच अमित रणनवरे ( सदस्य प्रधानमंत्री जनआरोग्य समिती.), मोहसिन मुल्ला ( आरोग्य मित्र ), संतोष रुकडीकर, अनिल बागडी पाटील ,सुरज पाटील, राजू माळी, सचिन माळी, सचिन हारगे, विनोद पाटील, साहिल कलावंत इत्यादि उपस्थित होते.