आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ! विरोधक धास्तावले, जानेवारी महिन्यात…..

सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झालेले आहे. आमदार जयंत पाटीलही या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल आता सर्वत्रच वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेवर इस्लामपूर मतदारसंघातील सर्वच पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. पाटील यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी सध्यातरी आपले देव पाण्यात घातलेले आहेत.

शहरातील एका कार्यक्रमात सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. पाटील यांनी महायुतीत प्रवेश केल्यास आपले भवितव्य काय ? असा अस्वस्थ करणारा प्रश्न भाजप, राष्ट्रवादी व शिंदेसेनेतील स्थानिक नेत्यांना पडला आहे. परंतु योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेने समर्थक मात्र मौन बाळगून आहेत. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. यावर राजकीय वर्तुळात विविध पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

विशेषत: सांगली जिल्ह्याचे मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठीच राखून ठेवल्याचे मतदारसंघातून चर्चेले जात आहे. परंतु, भाजप किंवा राष्ट्रवादी (अजित पवार ) यापैकी एका पक्षात जयंत पाटील प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त होतोय. मात्र, जंयत पाटील यांच्या मौनाच्या भूमिकेमुळे इस्लामपूर मतदारसंघातील त्यांचे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

 त्यांच्या भूमिकेबद्दल आता सर्वत्रच वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी येत्या जानेवारी महिन्यात आमदार जयंत पाटील योग्य निर्णय घेतील, असा अंदाज आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.