गारपिटीमुळे भाज्यांचे नुकसान; आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या

यंदाच्या वर्षी वातावरणात झालेल्या बदलांमुळे (Changes in Weather) शेतकर्‍याला (Farmers) प्रचंड नुकसान (Loss) सहन करावे लागले आहे. अवकाळी पावसामुळे पिके वाहून गेली तर काही ठिकाणी पिकांवर रोग पडला, बुरशी धरली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला. त्यातच राज्यभरात काही ठिकाणी गारपीट झाली. विदर्भाला याचा मोठा फटका बसला. या खराब हवामानामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे.

कमी भाज्यांच्या उत्पादनामुळे भाज्या महागल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसानासह सामान्यांच्या खिशालाही कात्री बसणार आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुधीभोपळा, फ्लॉवर आणि मिरचीसह अनेक पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

बाजार समितीमध्ये काल राज्याच्या विविध भागांतून आणि परराज्यांमधून ६५५ वाहनांतून ३००० टन भाजीपाल्याची आवक झाली. दुधीभोपळ्याची किंमत दर किलोमागे ११ ते १५ रुपयांवरुन २८ ते ४० रुपयांवर गेले आहेत. फ्लॉवरचा दर ८ ते १० रुपयांवरुन १० ते १४ रुपयांवर गेला आहे. याशिवाय हिरव्या मिरचीसह पालेभाज्यांचेही दर वधारले आहेत.

भाज्यांच्या दरांत अशी वाढ झाली आहे :-

  • दुधीभोपळा – आधीचा दर ११ ते १५ रुपये किलो, आताचा दर २८ ते ४० रुपये किलो
  • फ्लॉवर – आधीचा दर ८ ते १० रुपये किलो, आताचा दर १० ते १४ रुपये किलो
  • कारले – आधीचा दर १० ते १५ रुपये किलो, आताचा दर १४ ते २२ रुपये किलो
  • ढोबळी मिरची – आधीचा दर २० ते २४ रुपये किलो, आताचा दर २५ ते २८ रुपये किलो
  • फ्लॉवर – आधीचा दर ८ ते १० रुपये किलो, आताचा दर १० ते १४ रुपये किलो
  • हिरवी मिरची – आधीचा दर ३४ ते ४० रुपये किलो, आताचा दर १६ ते ८० रुपये किलो
  • कोथिंबीर – आधीचा दर १० ते १५ रुपये जुडी, आताचा दर ६ ते २८ रुपये जुडी
  • मेथी – आधीचा दर १० ते १५ रुपये जुडी, आताचा दर ७ ते २२ रुपये जुडी

हे दर घाऊक बाजारातील असून साध्या बाजारात गेल्यास सध्या तरी या स्वस्त किमतीत भाज्या मिळत नाहीत. यापेक्षा अधिक किंमतीने भाज्या विकल्या जात आहेत.