हातकणंले मधील इतक्या लोकांना मिळणार कुणबी दाखल्याचा लाभ!

महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५ लाख ५६ हजार ५५० नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी ८,८४८ दाखल्यांवर कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. परिणामी, हातकणंगले तालुक्यातील ३ लाख १९ हजार ७१६ मतदारांपैकी ४५ हजार लाभाथ्र्यांना कुणबीच्या सवलती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

समितीने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील महसूल विभागाच्या सर्व अभिलेख (रेकॉर्ड), कारागृह, दुय्यम निबंधक, राज्य उत्पादन शुल्क, जन्म- मृत्यू नोंदणी आदींचे सर्व अभिलेखे तपासून त्यातील नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. या शोधमोहिमेत राज्यात यापूर्वी नोंद आढळून येत नाही, अशी निकाली समज देण्याचे प्रमाण अधिक होते. आता मात्र थेट नोंदीच आढळून आल्या आहेत. हातकणंगले २०१९ च्या जणगणनेनुसार ३ लाख १९ हजार ७१६ मतदारांची नोंद आहे.

या मतदारांपैकी ५ लाख ५६ हजार ५५० नोंदी तपासल्या असून, त्यापैकी ८,८४८ दाखल्यांवर कुणबीच्या नोंदी आढळल्या. परिणामी, ४५ हजार लाभार्थ्यांना कुणबीच्या सवलती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मोडी लिपीमधून आणखी नोंदी सापडण्याची शक्यता आहे. नोंदी संकेतस्थळावर उपलब्ध अनेकदा होणार असल्याने भाऊबंदकी, नात्यातील वादामुळे एकमेकांना उपलब्ध होत नसलेल्या या नोंदी आता सहजपणे मिळणार आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर सध्या शोधलेल्या नोंदी १९६७ पूर्वीच्या आहेत. ज्यांची नोंद आढळली त्यांचा अगदी १९६७ या जन्म असला, तरी आज त्यांचे वय ५६ आहे. त्यांची मुले, नातवंडे अशी कमाल संख्या जरी दोन इतकी धरती, तसेच ज्यांची नोंद आहे त्यांची सख्या भाऊ-बहीण, चुलतभाऊ-बहीण, सख्ख्या भावाची मुले, चुलतभावांची मुले यांनाही या नोंदीचा लाभ होणार आहे. आजोबा-पणजोबा यांच्या नोंदी असतील तर रक्त्याच्या नात्यातील लोकांची ही संख्या आणखी वाढणार आहे.

अशा आढळल्या नोंदी
जन्म-मृत्यू पत्रकावरून (मराठी) ३ लाख ९२ हजार ५६८ दाखले तपासल्यापैकी ३,०६५ नोंदी आढळल्या. मोडी लिपीमध्ये ७४,४९६ पैकी ५,७८३ नोंदी आढळल्या. हक्क नोंद व वारसा हक्क नोंदीवरून २३,७२१ व कडई पत्रावरून ६५,७६५ कागदपत्रे तपासली. परंतु, एकही नोंद आढळली नाही. एकूण ५ लाख ५६ हजार ५५० पैकी ८,८४८ दाखल्यांवर कुणबीची नोंद आढळली आहे.