छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, राजवाडी तलावजवळील जलसेतूचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अशी आग्रही मागणी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी नागपूर अधिवेशनात अवचित त्याचा मुद्दा मांडून विधानसभेत केली. यावेळी सभागृहात बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे. हे उपकेंद्र खानापूर येथे लवकरात लवकर व्हावे तसेच ब्रिटिश कालीन राजेवाडी तलावाच्या पुजारवाडी हद्दीतील जलसेतूचे काम दोन वर्षे रखडले आहे. त्यामुळे राजेवाडी, दिघंची आणि लगतच्या गावांना पाणी मिळणास झालं आहे हे काम रखडेविणाऱ्या कंत्राट दाराला काळया यादी टाका. नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून हा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी केली.
पहिल्यांदाच राजेवाडी तलावात उरमोडी व जे कटापूर योजनेचे पाणी आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. परंतु पुजारवाडी येथील जलसेतूचे काम ठेकेदाराने अर्धवट व अपूर्ण ठेवल्याने या भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला आहे. जलसेतूचे काम रखडल्याने राजेवाडी तालुका तलावातील पाण्याचा लाभ पुजारवाडी, पांढरेवाडी, दिघंची, उंबरगाव, खवासपूर गावातील शेतकऱ्यांना मिळत नाही. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार बाबर यांनी केली. तसेच आटपाडी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेले शेंडगेवाडी गाव आटपाडी नगरपंचायत मधून वगळले आहे. त्यामुळे शेंडगेवाडीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करावी, अशीही मागणी आमदार बाबर यांनी केली.