जत विधानसभा मतदारसंघातून विकासपुत्र म्हणून आटपाडीच्या भूमिपुत्राने दणदणीत विजय मिळविल्याने मंगळवारी (दि. २४) भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आटपाडीत भव्य गौरव सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यांसाठी राज्यातून आ. पडळकर समर्थक उपस्थित राहणार असून तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्तेनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यानिमित्त शनिवारी कार्यकर्ते यांची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. हेलिक्टरवरून महा पुरुषांच्या पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आटपाडी शहरात भव्य रॅली होणार आहे. राज्यातील पहिल्यांदाच असा नागरी सोहळा आटपाडीत होणार आहे. यावेळी सदर कार्यकर्तेबाबत आपल्या नियोजन प्रक्रिया मांडल्या. यावेळी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, यू. टी. जाधव, चंद्रकांत दौडे, राहुल सपाटे, प्रणव गुरव, महादेव पाटील, विष्णूपंत अर्जून, गणेश भुते, अनिल सूर्यवंशी, सचिन डिगोळे, जीवन कासार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. गोपीचंद पडळकर यांच्या गौरव समारंभानिमित्त आटपाडी शहरात विविध ठिकाणी स्वागत कमान उभा करण्यात आलेल्या आहेत. आटपाडीच्या भूमिपुत्राने जतमधून विकासपुत्र म्हणून मिळविलेला आमदारकीचा आनंदोत्सव म्हणून मंगळवारी दि. २४ डिसेबर रोजी आटपाडी शहरात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक कार्यकत्यांनी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली गौरव सोहळा आयोजीत केला आहे. तालुक्याच्या वतीने राजकारणाच्या सुपुत्राचा होणारा गौरव सोहळा लक्षवेधी होणार आहे. आ. पडळकर हे जत मतदारसंघाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे आटपाडी तालुक्याशी ऋणानुबंध आहेत. त्यामुळे गौरव सोहळ्यासह आटपाडी तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.