मंत्रिपदाची घालमेल, कार्यकर्त्यांच्यात धाकधूक वाढली ; राजकीय वर्तुळात उत्सुकता

भाजपचे सर्वाधिक चार आमदार सांगली जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सांगली जिल्ह्यातून आमदार सुहास बाबर हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय आमदार मानले जातात. गत मंत्रीमंडळमध्ये संभाव्य मंत्री मंडळामध्ये स्व. अनिलभाऊ बाबर यांचे नाव कायम अग्रभागी राहिले होते. परंतू त्यांचे निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून जिल्ह्यातून कोणही निवडून आले नाही. मात्र विधानपरिषद आमदार म्हणून ईद्रिस नायकवडी असले तरी त्यांचे नाव मंत्री मंडळाच्या यादीत नाही.