इचलकरंजी येथील कागवाडे मळा परिसरातील जिम्नॅशियम मैदानामध्ये गॅलरी उभारणी व सोयी सुविधा पुरविणे कामास प्रारंभ झाला. नगरोत्थान योजना व दलितवस्ती योजना अंतर्गत एक कोटी २० लाख रुपये खर्च करणेत येत आहेत. सदरचे कामपूर्ण झाल्यानंतर खेळाडू व प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. शहरात अनेक लहान मोठे मैदान आहेत. त्यामध्ये राजाराम स्टेडियम हे लेदर बॉलवर क्रिकेट खेळण्यासाठी आरक्षित आहे. तर कागवाडे मळा परिसरातील जिम्नॅशियम मैदानावर टेनिसबॉल क्रिकेटसह अन्य खेळांसाठी वापरले जाते. जिम्नॅशियम मैदानावर सातत्याने क्रिकेटचे सामने भरविले जातात. त्याला विविध क्रिकेट संघांचा मोठा प्रतिसाद मिळतो. क्रिकेट संघांबरोबर सामने पाहण्यासाठी क्रीडा शौकीनांची मोठी गर्दी असते. अनेक स्पर्धावेळी खेळाडू व प्रेक्षकांच्या सोयीसाठी लाकडी प्रेक्षक गॅलरी उभी केली जाते. मात्र, गॅलरीला मोठ्या प्रमाणात भाडे आकारल्यामुळे अनेक आयोजकांना ते न परवडणारे ठरते.
त्यामुळे अनेक क्रिकेट संघांनी जिम्नॅशियम मैदानावर खेळाडूंसाठी सुविधा तसेच प्रेक्षकांसाठी कायमस्वरूपी गॅलरी बांधावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. सदर मागणीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने मैदानामध्ये गॅलरी उभारणी व सोयी सुविधा पुरवणे आदी कामांना सुरूवात केली आहे. त्यासाठी नगरोत्थान योजना व दलितवस्ती योजनेतून १ कोटी २० लाख रुपये खर्च करणेत येणार आहेत. मैदानामध्ये स्टेज उभारणीबरोबर उपलब्ध जागेत आवश्यकतेप्रमाणे लहान-मोठी गॅलरी उभारणे कामास सुरूवात केली. त्यामुळे सध्या खेळासाठी हे मैदान बंद करणेत आले आहे. तसेच मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार नामदेव मैदानच्या रस्त्यावर सूचना करावेत अशी मागणी होत केले आहे. सदरचे काम पूर्ण आहे. झाल्यावर या मैदानाला आकर्षक रूप येईल. त्याचबरोबर खेळाडू व प्रेक्षकांना कायमस्वरूपी प्रेक्षक गॅलरी उपलब्ध होणार आहे. सदरचे काम दर्जेदार होण्यासाठी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी वैयक्तिक लक्ष देवून कामासंदर्भात संबंधित विभाग व मक्तेदाराची बैठक होऊन सूचना करावेत अशी मागणी होत आहे