इचलकरंजीतून कोल्हापूर, मिरज मार्गावर रात्रीची बससेवा सुरू, भारतीय जनता पार्टीच्या मागणीला यश!

इचलकरंजी शहरासह नजीकचा परिसर व सीमावर्ती भागासाठी श्री शिवतीर्थ इचलकरंजी बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, मिरजसह आसपासच्या परिसरातून नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रात्रीच्या सुमारास ये- जा करण्यासाठी इचलकरंजीतून एस.टी. फेऱ्या नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची कुचंबणा होती. रात्रीच्या सुमारास एखादी एस. टी. फेरी सुरु करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष पै अमृत मामा भोसले यांच्याकडे व्यापारी,प्रवाशी वर्गातून केली जात होती. भारतीय जनता पार्टी इचलकरंजी यांच्या या मागणीला अनुसरुन इचलकरंजी आगाराच्या वतीने शुक्रवारपासून इचलकरंजी-कोल्हापूर आणि इचलकरंजी-मिरज अशी एस. टी. फेरी सुरु करण्यात आली आहे.

कोल्हापूरसाठी इचलकरंजी डेपोतून रात्री १०.३० वाजता शेवटची एस. टी. निघेल. हीच एस.टी. कोल्हापूरातून रात्री ११.४५ वाजता सुटेल. तर इचलकरंजीतून मिरजेला सांगली मार्गे जाणारी एस. टी. ९ वाजता निघेल. हीच एस.टी. त्याचमार्गे मि रजेतून रात्री १०.३० वाजता सुटेल, असे इचलकरंजी आगाराच्या वतीने या फेऱ्या सुरु केल्यामुळे प्रवाशी सांगण्यात आले. वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष पै अमृत मामा भोसले यांनी इचलकरंजी आगार व्यवस्थापक यांच्या सह. अधिकारी यांचे आभार मानले आहेत.