यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे बारावी विज्ञानच्या २०२३-२४ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘शरद स्कॉलर २०२४’ या परीक्षेचे आयोजन केले आहे.परीक्षा ४ एप्रिलला राज्यातील विविध जिल्ह्यांतील केंद्रांवर होणार आहे. नोंदणी १५ मार्चपर्यंत करण्याची आहे.
यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख रुपयासह अनुक्रमे ५० हजार, ४० हजार, ३० हजार व २० हजार रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम विद्यार्थ्यास १० हजार रुपये व इतर पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे बक्षीस आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना शुल्क ५० रुपये भरावे लागणार आहे.
परीक्षा ही बहुविकल्पीय असून एकूण ७५ प्रश्न असतील. गणित २५ (५० गुण), भौतिकशास्त्र २५ (२५ गुण), तसेच रसायनशास्त्राला २५ गुण असतील.
परीक्षा जिल्ह्यातील कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, मुरगूड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, तर सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, म्हैशाळ, इस्लामपूर, जत व पलूस, सोलापुरात सोलापूर, सांगोला, दहिवाडी, सातारा-कराड, पाटण, पुणे, रत्नागिरी, निपाणी (बेळगाव) या केंद्रांवर परीक्षा होणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.