प्रत्येक मराठ्यांच्या मनातील मराठा भवन उभारणीसाठी येत्या वर्षात पाठपुरावा करण्याचा मराठा महासंघाचा निर्धार

हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा मान असणाऱ्या कोल्हापूरमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त मराठा समाज असूनही हक्काचे भवन नाही ही उणीव भरून काढण्यासाठी व प्रत्येक मराठ्यांच्या मनातील मराठा भवन उभारणीसाठी येत्या वर्षात पाठपुरावा करण्याचा निर्धार मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीचे आयोजन महादेव मंदिर मंगळवारपेठ येथे करण्यात आले होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक हे होते. यावेळी स्वागत जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले. यासाठी पारदर्शक निधी संकलनसाठी घरोघरी संपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेत जास्तीतजास्त समाज बांधवांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रयत्नशील रहाण्याचा निर्णय घेतला. ही बैठक वसंतराव मुळीक, जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, गायकवाड, डॉ. लक्ष्मीकांत नलवडे, महादेव केसरकर, रणजित आयरेक, गोपाळ पाटील, गुरुदास जाधव, सर्जेराव चव्हाण, जयसिंग हवालदार, शरद साळुंखे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आभार इंद्रजित माने यांनी मानले.