सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष? विलीनीकरणाआधी पडद्यामागे मोठी घडामोड, अपडेट काय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. येत्या दोन दिवसात दिल्लीत मोठी खलबतं होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रि‍करणावर दोन्ही बाजूने मतमतांतरं सुरू होती. अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी बैठकी घेतल्या आणि 12 फेब्रुवारी रोजी तशी घोषणा करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाअगोदर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे नाव समोर आल्यानंतर वातावरण तापले होते.

सुनेत्रा पवारांकडं पक्षाची धूरा?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या आज पहिल्यांदा पदभार स्वीकारतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धूरा सुद्धा त्यांनीच सांभाळावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी मांडली. अनेकांनी जाहिररित्या सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची भूमिका घेतली. तर पुण्यासह बीडचे पालकमंत्री पदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आले आहे. तर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवावी अशी मागणी जोर धतर आहे. आज पक्षाच्या आमदारांची बैठक मुंबईत थोड्याच वेळात होत आहे. तेव्हा या बैठकीत याविषयीचा निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार

मंत्रालयात आज सुनेत्रा पवार कार्यालयाचा पदभार स्विकारणार आहेत. मंत्रालयाचा सहावा मजला सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. कुंड्या लावून बाहेरचा परिसर करण्यात आला स्वच्छ तर आत स्वागताची तयारी सुरू केली आहे. सुनेत्रा पवार लवकरच मंत्रालयात येतील. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक आणि चैत्यभूमिला भेट दिली. यानंतर त्या विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्रालयात कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.

दहा वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

दरम्यान मंत्रालयात दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार या दहा वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आजच सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल होणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असल्याने चर्चांना पेव फुटले आहे.राष्ट्रवीदाच्या विलीनीकरणाविषयी फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती पण समोर येत आहे.

आज कॅबिनेट बैठक आहे.त्यामुळे सुनेत्रा पवार यांची ही पहिली कॅबिनेट बैठक असणार आहे. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्र हळहळलाय. राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा अजूनही सुरूच आहे, त्यामुळे आज कॅबिनेटनंतर सुनेत्रा पवार ह्या दिल्लीला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. राज्यात काही महत्वाच्या घडामोडी या निमित्ताने घडणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.