अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असल्याकारणाने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. अशातच बिबट्याची दहशत देखील अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे बिबट्याने चक्क हल्ला करून 11 मेंढरांचा फडशा पाडला. ऐतवडे बुद्रुक येथील बाबासाहेब पाटील यांच्या शेतामध्ये मेंढपाळ शंकर वाघमोडे यांच्या मालकीची मेंढरे बसवण्यात आलेली होती.
बिबट्याने या मेंढरांच्या कळपावर हल्ला केला आणि यामध्ये अकरा मेंढरे मृत्यू पावली. या घटनेची जेव्हा माहिती आमदार सत्यजित देशमुख यांना मिळाली त्यावेळेस त्यांनी घटनास्थळी स्वतः तेथे जाऊन घटनेची माहिती घेतली आणि वनविभाग अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सूचना देखील केल्या. आमदार देशमुख यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्वत्र त्यांच्या तत्परतेची चर्चा रंगली आहे.
