तळीरामांचा थर्टी फर्स्ट दणक्यात; मद्य विक्री दुकाने पहाटेपर्यंत राहणार सुरू 

नवीन वर्षाची सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मोठ्या उत्साहाने तयारी करत आहे.या दिवशी दारू पिणार्‍यांची संख्या अधिक असते. अशा मद्यप्रेमींना आता खुशखबर दिली आहे. थर्टी फर्स्ट निमित्त दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदेश काढले आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन दणक्यात होणार आहे. अनेकजण दारू पिऊन सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करतात. या काळात दारूची सर्वाधिक विक्री होते. थर्टी फर्स्टच्या दिवशी दारू पहाटेपर्यंत उपलब्ध होणार आहे. बीअर/वाईन विक्री करणार्‍या दुकानांना 1 वाजेपर्यंत विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

गृह विभागाच्या आदेशानुसार दारू दुकानांची वेळ 31 डिसेंबरच्या दिवशी वाढवण्यात आली आहे. रात्री 1 वाजेपर्यंत दारूची दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.दरम्यान, थर्टी फर्स्टच्या दिवशी रिर्साट, हॉटेल आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांना एक दिवशीय परवाना घेणे बंधनकारक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हा परवाना दिला जातो.