आमदार सुहासभैया बाबर पुन्हा चर्चेत! चुटकीसरशी सोडवला प्रश्न …

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार सुहास भैय्या बाबर निवडून आले आणि त्यांची आमदारपदी निवड झाली. त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडविले आहेत. आमदार सुहास भैय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नेहमीच समाजकारणामध्ये अग्रभागी असणारे श्रीधर जाधव यांनी नुकतेच विटा नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्या केबिन समोर पाणीपुरवठ्याच्या संदर्भात एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले होते. त्याचवेळी आमदार सुहास बाबर यांनी नगरपालिका प्रशासकास त्वरित आदेश देऊन पाणीपुरवठ्याबद्दल योग्य मार्ग काढण्यास सांगितले होते.

त्याप्रमाणे नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन पाणीपुरवठा योग्य व सुरळीत केला. त्याबद्दल श्रीधर जाधव यांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले. यावेळी युवानेते सुजय भैय्या गोसावी उपस्थित होते.