ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी यावेळेस आमदार सुहासभैया बाबर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे देखील उपस्थित होते. आमदार सुहासभैया बाबर यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचा आमदार सुहास बाबर, बंधू अमोल बाबर, हेमंत बाबरसह कुटुंबीयांनी सन्मान केला.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी बाबर कुटुंबीयांबरोबर मनमोकळेपणे संवाद साधला. तसेच स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आमदार सुहास भैया बाबर यांना महायुतीच्या सरकारमध्ये चांगलीच मदत करू असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार सुहास भैया बाबर यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचा पाहुणचार केला. तसेच गोरे यांनी बाबर कुटुंबीयांसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला.यानंतर आमदार सुहास भैया बाबर, अमोल बाबर तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये चर्चा झाली.