सिग्नलजवळ असणारी अतिक्रमणे हटवण्याची वाहनधारकातून मागणी……

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई तर जाणवतेच म्हणजेच पाण्याचा प्रश्न हा जगजाहीर आहेच. तसेच या शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी देखील खूपच पाहायला मिळते. त्यामुळे वाहनधारकातून नेहमी नाराजीचा सूर उमटत असतो. तसेच वाहतुकी कोंडीमुळे अपघातांच्या प्रमाणात देखील दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रस्त्याभोवती असणारे अतिक्रमणे यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमंडलेली आहे. इचलकरंजी शहरात प्रांत कार्यालय चौक, शिवतीर्थ को. मलाबादे जनता चौक, अटल बिहारी वाजपेयी चौक, डेक्कन चौक, शाहू पुतळा चौकात वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे.

पण या मुख्य चौकामध्ये फळविक्रेते, हॉटेल व्यवसायिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. भर रस्त्यातच वाहने लावून अशा दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक जात असतात. त्यामुळे सिग्नल जवळच वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेबरोबरच इचलकरंजी महानगरपालिका या अतिक्रमण बाबतीत लक्ष द्यावे, अतिक्रमणांवर कारवाई करून सिग्नल व्यवस्था सुरळीत करावे जेणेकरून वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही अशी मागणी वाहनधारकांमधून होऊ लागलेली आहे.