थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करण्यासाठी घरच्या घरी बनवा व्हेज, नॉनव्हेज बिर्याणी रेसिपी …….

व्हेज बिर्याणी

गैस वर पातेल्यात तेल टाकून वरिल सर्व खडे मसाले घालून छान भाजुन घ्या.आणी पाणी ओता पाण्याला उखळि आली की त्यात बासमती तांदूळ घाला आणी फुल गैसवर 7 ते 8 मीनीट उखळत ठेवा नंतर गैस बंद करून भांड्यावर चाळण बसेल असे भांडे घ्या त्यावर चाळण ठेवा आणी त्यात भात ओतून घ्या म्हणजे भातातिल सर्व पाणी त्या भांड्यात जमा होईल आणी चाळणीला झाकुन ठेवा म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. भाजी तयार होईपर्यंत तसेच झाकून ठेवावे.


भातातील सर्व खडे मसाले बाजुला काढून घ्या. छान सूटसुटीत भात तयार.गैस वर कढईमध्ये तेल आणी तुप टाकून लांब कापलेल्या कांदा भाजून घ्या.आणी लाल मिरची कोबी,फ्लॉवर,गाजर बटाटा,कॉर्न, मटार,टोमॅटो, गरम पाण्यातून निथळून काढलेली सोयाबीन वडी हे सर्व छान परतुन घ्या.

सर्व परतून झाल की वरुन 1चमचे तुप घाला आणी लाल तिखट,मीठ, हळद आणी कूटलेले मिरे,खिसलेलआलं लसूण घाला आणी झाकण ठेवा (हव तरच मधे मधे पाण्याचे हपके दया) आणी भाज्या छान शिजवून घ्या. (मी पाणी न वापरता भाजी शिजवली आहे) तुप टाकल्यामुळे भाजी कढई ला चिकटत नाही.


(आवडी नुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता)आता कढईतील थोडी तयार भाजी बाजूला काढून घ्या आणी उरलेली भाजी वर तयार भात आणी बारिक चिरलेली कोथिंबीर,पुदीना पसरवून घ्या. भाजी,भात,कोथींबीर,पुदीना असा थर 2 ते 3 वेळा करुन घ्या. बारीक गैस वर 10 मीनीटा साठी झाकण ठेवून दया व 10 मीनीटाने तयार बिर्याणी मीक्सर करुन घ्या. अप्रतिम अशी गरमा गरम व्हेज बिर्याणी तयार.

चिकन बिर्याणी

बसामाती तांदूळ 3 ते 4 पाण्यात धुवून 1 तास पाण्यात भिजत ठेवणे.चिकन स्वच्छ धुवून त्यात 200 ग्रॅम दही 1 आणि 1/2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट,1 टेबलस्पून बिर्याणी मसाला,1 आणि 1/2 टेबलस्पून लाल तिखट,1/2 टेबलस्पून हळद,1/2 टेबलस्पून गरम मसाला,1 टेबलस्पून लिंबाचा रस घालून चिकन ला सर्व साहित्य नीट लावून दीड तासासाठी मॅरीनेट करणे.1 तासाने बिर्याणी साठी लागणारा तांदूळ शिजवणे. त्यासाठी गॅस वर एका पातेल्यात 4 ते 5 ग्लास पाणी गरम करून त्यात खडा मसाला घालणे.(1 तमालपत्र,1 मोठी वेलची,2 छोटी वेलची,1 चक्री फुलं,3 ते 4 काळी मिरी आणि लवंग, 1 ते 2 दालचिनी) नंतर त्यात तांदळापूरत मीठ घालणे. पाण्याला उकळी आली कि त्यात भिजवलेला तांदूळ घालणे. तांदूळ 80 ते 90 टक्के शिजवून घेणे. तांदूळ शिजला कि त्यातील एक्सट्राच पाणी काढून भात थंड करायला ठेवणे.

बिर्याणी साठी लागणारा कांदा तळून घेणे.3 कांदे उभे चिरून त्यांना थोडं मीठ व साखर लावून कांदा हाथाने कुस्करून मोकळा करून घेणे.5 ते 10 मिनटं कांदा बाजूला ठेवणे. 10 मिनीटांनी कढई मध्ये तेल गरम करून कांदा छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यन्त तळून घेणे.

बिर्याणी साठी लागणारी चिकन ग्रेव्ही शिजवणे. त्यासाठी कढई गॅस वर ठेवून त्यात तेल घालणे. तेल गरम झालं कि त्यात 1/2 टेबलस्पून जिरं घालणे. नंतर त्यात एक तमालपत्र आणि 3 कांदे बारीक चिरून घालणे. कांदा लालसर होईपर्यत छान परतून घेणे. कांदा लालसर परतला कि त्यात 2 टोमॅटो बारीक चिरून घालणे. टोमॅटो छान मऊ झाले कि त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालणे. नंतर त्यात 1/2 टेबलस्पून धने पूड आणि 1/2 टेबलस्पून जिरं पूड व चिरलेली कोथिंबीर घालणे. चिकन मध्ये पाणी घालून 15 ते 20 मिनिट झाकण लावून चिकन शिजवणे.

बिर्याणी च्या लेअर तयार करणे. त्यासाठी एका जाड बुडाच्या पातेल्यात तळाला शिजवलेली चिकन ग्रेव्ही घालणे. नंतर त्यात शिजवून थंड केलेला तांदूळ घालणे.नंतर तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याची पानं घालणे. नंतर 1 टेबलस्पून खाण्याचा कलर आणि 3 टेबलस्पून साजूक तूप घालणे.वरतून थोडासा बिर्याणी मसाला आणि लिंबू पिळून घेणे. अश्याप्रकारे दुसरी लेअरही करून घेणे.

बिर्याणी च्या लेअर करून झाल्या कि झाकण लावून बिर्याणीला गॅस वर मंद आचेवर 7 ते 8 मिनटं वाफ काडून घेणे. नंतर गरम गरम तयार बिर्याणी प्लेट मध्ये काढून कांदा आणि लिंबाच्या फोडी सह सर्व्ह करणे.

टीप : बिर्याणी साठी तांदूळ वापरताना तो शिजवून थंड करून मगच वापरावा. थंड झाला कि भात छान मोकळा होतो.