इचलकरंजी येथील शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडी कडून येणारी जूनी पाण्याची दाबनलिका मजरेवाडी जॅकवेल जवळ गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहरास होत असलेला पाणी पुरवठा काल दुपारी ४.३० वाजले पासून तातडीने बंद करणेत आलेला आहे.
सदर ठिकाणची गळती काढनेचे काम महानगर पालिकेच्या वतीने तातडीने हाती घेतलेने शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार असलेने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. याबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे.
सदर पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणी साठा जपून वापरून महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.