इचलकरंजी युवतीच्या विनयभंगप्रकरणी डॉ. अभिनंदन धोतरे याला अटक न केल्याने वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलिस उपअधीक्षक साळवे यांना जाब विचारला. डॉ धोतरे याला तातडीने अटक करण्याची मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले. महिलांनी संताप व्यक्त करत त्वरित अटक न केल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. धोतरेला अटक होत नसल्याने महिला, वंचित बहुजनचे कार्यकत्यांनी पोलिस उपाधीक्षक कार्यालय गाठले.
पोलिस उपाधीक्षक साळवे यांना यांच्यासमोर अटकेच्या कारवाईसाठी दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून महिलांनी संताप व्यक्त केला. साळवे यांनी डॉ. धोतरे याचा शोध सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, डॉ. धोतरे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. धोतरे स्वतःहून ठाण्यात हजर राहण्याची शक्यता आहे.