भारतीय हवाई दलात नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु……

भारतीय हवाई दलात (IAF) नोकरी करू इच्छित असणाऱ्या तरूणांसाठी सुवर्णसंधी संधी आहे. हवाई दलामध्ये अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 7 जानेवारीपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवार 27 जानेवारी 2025 पर्यंत पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in ला भेट द्यावी लागेल.

पात्रता

भारतीय हवाई दलात अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सोबतच उमेदावारांनी 3 वर्षांच्या इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये (मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन टेक्नोलॉजी/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी) इंग्लिशह कमीत कमी 50 टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.


इतर विषयात शिक्षण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. उमेदवारांना 12वी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण आणि इंग्लिश विषयात देखील 50 टक्के असणे आवश्यक आहे.
याशिवाय त्यांनी किमान 50 टक्के गुणांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रमही पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 17.5 वर्षे आणि कमाल वय 21 वर्षे असणे गरजेचे आहे.
ज्या उमेदवारांची जन्मतारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान आहे, ते अर्ज करू शकता.
या पदांसाठी उंचीची देखील अट आहे. पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांची उंची 152 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. ईशान्य भारतीय, उत्तराखंड आणि लक्षद्वीपमधील उमेदवारांना उंचीमध्ये सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

अर्जाचे शुल्क

उमेदवारांना अर्ज भरताना 550 रुपये परीक्षा शुल्क जमा करावे लागतील.

अर्ज प्रक्रिया

इच्छुक व पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 पर्यंत agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. वेबसाइटवर जाऊन तुम्हाला वैयक्तिक माहिती व कागदपत्रे अपलोड करावे लागेल. तसेच, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता व अर्जाची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी.