कणेरी मठासह कोल्हापुरातील ‘या’ तीर्थस्थळांसाठी तब्बल 35 कोटी मंजूर!

कणेरी येथील सिद्धगिरी मठासह जिल्ह्यातील विविध तीर्थस्थळांसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.राज्य सरकारच्या ‘ब’ वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेंतर्गत हा निधी दिला आहे.

याअंतर्गत विविध प्रकारची कामे करण्यास येणार असून, यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला गती मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.राज्यातील तीर्थक्षेत्रांचे संवर्धन व्हावे, तेथे मूलभूत सुविधा असाव्‍यात, यासाठी राज्य सरकारने तीर्थस्थळ विकास योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांना ३५ कोटींचा निधी मिळाला आहे. कणेरी येथील सिद्धगिरी मठाला ३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

तसेच सिद्धनेर्ली येथील श्री सिद्धेश्वर देवालयाला २ कोट, पिराचीवाडी येथील श्री गहिनीनाथ देवालयाला २ कोटी, लिंगनूर येथील भावेश्वरी देवालयाला ३ कोटी, चिमगाव येथील चिमंकाई देवीला १ कोटी, बोरवडे येथील केदारलिंग ज्योतिर्लिंग देवालयाला अडीच कोटी निधी दिला आहे.