इचलकरंजीत दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहन चालक याना चक्क जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. सध्या अनेक भागात ऊस वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांना खूपच सावकाश वाहने चालविणे गरजेचे बनले आहे. इचलकरंजी शहरात वैरण बाजार परिसरामध्ये दुचाकी तसेच ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे.

यावेळी दुचाकी वरील तिघेजण गंभीर जखमी झालेले आहेत. घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीस्वार वेगाने जात असताना समोरील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिक व युवकांनी त्वरित घटनास्थळी झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.