हुपरीतील मदरशावर नगरपालिकेची कारवाई; अतिक्रमण हटिवले

 हुपरी येथील यशवंत नगर मधील ग.नं. ४४८९ मधील मि.नं. ८४४/अ/१ मधील जमीनीवर मदरशा बांधकाम अतिक्रमित होते. मुस्लिम सुन्नत जमियतला अतिक्रमण संबंधी कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली व वेळोवेळी लेखी व तोंडी सूचना दिल्या असतानाही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हुपरी नगरपरिषद, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत शेड वजा बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली अशी माहिती मुख्याधिकारी अजय नरळे यांनी दिली. दरम्यान, १०० मीटर अंतरावर संचारबंदी लागू केली होती.

१६० पोलिस शिपायांसह काम पहाटेपासून सुरू केले अधिकारी व नगरपरिषदेचे ५० कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्त कारवाईची मोहीम राबविण्यात आली. प्रांताधिकारी मौसमी चौगुले / बर्डे, तहसिलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अजय नरळे, प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ, अप्पर पोलीस अधीक्षक निष खाटमोडे पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख खोचे, हुपरी पोलिस ठाण्याचे पीआय निंगापा चौखंडे, इचलकरंजी विभागाचे सचिन पाटील, सुर्यवंशी, पीएसआय प्रसाद कोळपे, अशोक चव्हाण, रावसाहेब हजारे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळावर तैनात होता.

कारवाई सुरू असताना प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हातांमध्ये छत्रपती शिवाजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराज, राजर्षी शाहूमहाराज, विश्वरत्न प्रतिमा घेऊन कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रितसर कारवाई सुरू असल्याचे सांगून जमलेल्या लोकांना पांगवण्यासाठी प्रयत्न झाला.