रुकडीतील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

३२ वर्षीय पिडीत युवतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार फिरोज निजाम शेख (रा. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती व संशयित फिरोज निजाम शेख यांची २१ नोव्हेंबर २०२४ रोजी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख झाली. बायोडाटा पाठवून पीडित युवतीसोबत मोबाईलवर बोलून, लग्रा संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापुरातील रंकाळा येथे घेण्यासाठी बोलावले. १ डिसेंबर २०२५ रोजी संशयित शेख हा पीडितेच्या रुकडी येथील घरी जाऊन आई वडिलांशी लग्नाविषयी बोलणे केले.

त्यानंतर ११ डिसेंबर रोजी पीडितेला कोल्हापूरातील महाद्वाररोडवरील एका लॉजवर बोलवून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच फळांचा व्यवसाय करण्यासाठी पैसे पाहिजेत असे सांगितले. पिडीतीने हातातील अंगठी गहाणवट ठेवून २५ हजार रुपये दिले. त्यानंतर इन्कम टॅक्स रेड पडणार आहे. मध्यस्थी व्यक्तीला साडेसहा लाख रुपये द्यायचे आहेत. तसेच वैद्यकीय कारण सांगून? आणि वेगवेगळी कारणे सांगून युवतीकडून रोख स्वरुपात १ लाख ९० हजार रुपये तसेच ११ तोळे सोन्याचे दागिने असे सुमारे ११ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केली. संशयित हा पीडित युवतीशी लग्न न करता पळून गेला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात संबंधित युवतीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. जुना राजवाडा पोलिसांनी या प्रकरणी संशयित फिरोज शेख याच्याविरोधात आर्थिक फसवणूक तसेच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.