अभिनय सोडून ‘या’ बिझनेसमधून करतात बाॅलिवूड अभिनेते बक्कळ कमाई! कोट्यावधींची उलाढाल

बाॅलिवूड कलाकार हे चित्रपटांमधून मोठी कमाई करताना दिसतात. इतकेच नाही तर फक्त चित्रपटच नव्हे तर कलाकार हे त्यांचे पैसे इतरही व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. जाहिरातीमधूनही कलाकार मोठी कमाई करतात. यामध्ये सलमान खान याच्या नावाचा देखील समावेश होतो.बाॅलिवूड अभिनेते हे नेहमीच चर्चेत असतात. अभिनयाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये अभिनेते कमावतात. इतकेच काय तर जाहिरातीमधूनही बक्कळ पैसा मिळतो. फक्त अभिनय आणि जाहिरातीच नाही तर अभिनेत्यांचे अनेक बिझनेस देखील आहेत.बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री हे अभिनयाच्या माध्यमातून तगडी कमाई करतात हे सर्वांनाच माहिती आहे. परंतू असे बरेच अभिनेते आहेत जे फक्त अभिनयाच्या माध्यमातूनच नाही तर इतरही काही बिझनेसच्या माध्यमातून करोडोंची कमाई करतात.

बाॅलिवूडचे असे बरेच कलाकार आहेत. जे चित्रपटांसोबतच इतर काही व्यवसायामधून कोट्यावधीची कमाई करतात. यामध्ये सलमान खान याच्या नावाचा देखील समावेश होतो. सलमान खान याने अनेक चाहत्यांच्या मनात आपले घर केले आहे. खूपच मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयातुनच नव्हे तर सलमान खान याचा कपड्यांचा ब्रॅंड असून तो त्यामधून मोठी कमाई करतो. बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन देखील अभिनयाशिवाय शेअर मार्केटमधून मोठी कमाई करतात. शेअर मार्केटमध्ये अमिताभ बच्चन यांचा मोठा पैसे लावलेला आहे. अजय देवगण हा देखील चित्रपटांसोबत इतर अनेक ठिकाणाहून पैसे कमावतो. अजय देवगण याने सोलर प्रोजेक्ट आणि प्रोडक्शन हाउसमध्ये पैसे लावले आहेत. त्यामधून त्याची चांगली कमाई होते.

शाहरूख खान याची आयपीएलमध्ये टीम असून त्याच्या माध्यमातून शाहरूख खान हा मोठी कमाई करतो. शाहरूख खान हा जाहिरातीमधूनही मोठी कमाई करतो. बाॅलिवू़ड अभिनेता अक्षय कुमार याचे एका वर्षाला सर्वाधिक चित्रपट रिलीज होतात. फक्त चित्रपटातूनच नाही तर अक्षय कुमार याचे स्वत: चे ऑनलाइन शॉपिंग चॅनल असून यातून तो बक्कळ अशी कमाई करतो. कतरिना कैफ हिचा स्वत:चा एक ब्युटी प्रोडक्ट ब्रॅंड आहे. यामधून कतरिना कैफ ही मोठी कमाई करते. के ब्युटी असे कतरिना कैफ हिच्या ब्रॅंडचे नाव आहे.अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील चित्रपटांसोबत इतर व्यवसायामधून मोठी कमाई करताना दिसते. कपड्यांचा देखील दीपिका पादुकोण हिचा एक ब्रॅंड आहे.