लवकरच आष्टा उपजिल्हा रुग्णालयास डायलिसिस सुविधा

शासनातर्फे अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात. ज्यांचा सर्वसामान्य लोकांना पुरेपूर लाभ देखील होतो. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेतेमंडळींकडून प्रयत्न देखील सुरु आहेत. जनतेला किंताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी खेडोपाडी अनेक सेवा सुविधा देखील सुरु केल्या जात आहेत. आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून इस्लामपूर व आष्टा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत.

दोन्ही ठिकाणी मशीन उपलब्ध करून दिल्यानंतरही मशीन वापरासाठी आवश्यक टेक्निकल स्टाफ उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची अनास्था दिसून आली. याबाबत जयंत पाटील यांनी राज्य सरकार व आरोग्य मंत्री यांच्याकडे टेक्निकल स्टाफची मागणी केली. परंतु लवकरच टेक्निकल स्टाफ उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी दिली. यावेळी देवराज देशमुख, शिवाजी चोरमुले, दिग्विजय पाटील, विक्रम पाटील, विनायक यादव उपस्थित होते.