अनेक भागातील होत असलेल्या विकासकामांमुळे शहराच्या विकासात भर पडू लागली आहे. आष्टा शहरात देखील अनेक विकासकामे केली जात आहेत. पेठ -आष्टा – सांगली हा राष्ट्रीय महामार्ग या शहराच्या मध्यवर्ती भागातून जातो. आष्टा शहरामध्ये या महामार्गावरती आहे. अनेक शिक्षण संस्थांची महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दुतर्फा रस्ता क्रॉस करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व आमदार जयंत पाटील यांना निवेदन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लवकरच आदेश दिले जातील अशी ग्वाही इस्लामपूर येथील आपल्या मनोगतात दिली. नव्याने काम सुरु असलेल्या सुमारे आठशे कोटी रुपये खर्चाच्या पेठ-आष्टा- सांगली महामार्गावरील आष्टा शहरासह लगतच्या गावात डिव्हायडरची उंची वाढवावी, सर्व्हिस रोड करावेत.
तसेच आष्टा शहरात शालेय विद्यार्थ्यांना जाणे येणेसाठी स्काय ओव्हर ब्रिज उभा करावा अशी मागणी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी निवेदनाद्वारे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार जयंत पाटील यांच्याकडे केली. मंत्री नितीन गडकरी यांनी स्काय ओव्हर ब्रिज बाबत लवकरच आदेश दिले जातील अशी ग्वाही दिली.
