गौरव नायकवडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांची भेट! भविष्यात विकास कामाबद्दल निधी कमी पडू न देण्याची ग्वाही

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र पहायला मिळाले. युवानेते गौरव नायकवडी यांनी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तिघांनी ही गौरव नायकवडी यांनी विधानसभेला प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल अभिनंदन केले व भविष्यातील विकास कामाबद्दल निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पद्मभूषणक्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्त विकासमहामंडळाबाबत गौरव नायकवडी यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच नियोजित एमआयडीसी संदर्भात वाळवा आष्टा यादरम्यान व्हावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चावेळी धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तबाबतचा २०१९ चा जीआर लागू करावा व महाविकास आघाडी सरकारने लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्या या संदर्भात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी सरपंच संदेश कांबळे, डॉ. राजेंद्र मुळीक पोपट अहिर, उमेश कानडे, संजय अहीर उपस्थित होते.