एजबेस्टन टेस्टमधून युवा फलंदाज बाहेर, करुण नायर नंबर 3 वर?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात आली असून यातील दुसरा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 विकेटने विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मागील 48 वर्षांमध्ये केवळ एकदाच भारताला या स्टेडियमवर टेस्ट सामना जिंकण्यात यश आलंय. यंदा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मैदानावर विजय मिळवून इतिहास घडवते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर 2 जुलै पासून होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल याची उत्सुकतता अनेक क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीम मॅनेजमेंट आपल्या दोन मॅच विनर गोलंदाजांशिवाय सामन्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून, जसप्रीत बुमराह एजबेस्टनमध्ये खेळणार नसल्याच्या बातम्यांना वेग आला होता, मात्र आता समोर येत असलेल्या माहितीनुसार बुमराह हा दुसऱ्या टेस्ट सामन्यात प्लेईंग 11 चा भाग असणार आहे. परंतु बुमराह खेळणार अशी माहिती येत असतानाच कुलदीप यादव यावेळी सुद्धा बेंचवरच असणार अशी शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टीम मॅनेजमेंट कुलदीप यादवला दुसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याच्या मूडमध्ये नाही, त्यांचं लक्ष हे वॉशिंग्टन सुंदरकडे असल्याचं कळतंय. ज्यामुळे या दोन गोष्टी जवळपास निश्चित आहे की दुसऱ्या टेस्टमध्ये कुलदीपच्या जागी सुंदर खेळेल आणि रवींद्र जडेजा हा त्याच्या गोलंदाजी फलंदाजी स्किलमुळे टीममध्ये स्थान मिळवेल. म्हणजेच 8 नंबर पर्यंत फलंदाजी मजबूत राहील आणि 9-10-11 वर सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप/ जसप्रीत बुमराह हे खेळू शकतील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम मॅनेजमेंटकडून मिळालेला दुसरा संकेत तर अजूनच आश्चर्यकारक आहे. पहिला टेस्ट खेळणाऱ्या साई सुदर्शनला दुसऱ्या टेस्टमध्ये संधी दिली जाणार नसल्याचं कळतंय. तर करुण नायरला (Karun Nair) नंबर 3 वर फलंदाजी करायला पाठवलं जाऊ शकतं. याच कारण असं ही सांगितलं जातंय की शार्दूल ठाकूरच्या जागी नितिश रेड्डीचं खेळणं निश्चित आहे. तसेच वॉशिंग्टनच्या येण्याने नंबर 8 पर्यंत फलंदाजी वाढू शकते.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
यशस्वी जायसवाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल, ऋषभ पंत, नितिश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, मोहम्म्द सिराज, प्रसिद्र कृष्णा, आकाशदीप/ जसप्रीत बुमराह