सध्या सरकारकडून अनेक नवनवीन विकास कामे सुरू झालेली आहेत. अनेक नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत. अनेक बदल देखील करण्यात येत आहेत. राज्यात नवीन 21 जिल्ह्यांच्या निर्मितीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचे प्रस्ताव शासन दरबारी सादर झालेले आहेत. यामध्ये स्वतंत्र माणदेश जिल्हा करण्याचाही प्रस्ताव आहे.सातारा जिल्ह्यातून उगम पावलेल्या सांगली आणि नंतर सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला मिळणाऱ्या मानगंगा नदीचा भूभाग माणदेश म्हणून ओळखला जातो. प्रस्तावित माणदेश जिल्ह्याचे मुख्यालय हे सांगोला करण्यात यावे अशी मागणी लहुजी पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी केलेली आहे.
सांगोला हे प्रस्तावित माणदेश जिल्ह्याचे मुख्यालय करण्याची मागणी
