अनेक भागांमध्ये भरमसाठ अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. अनेक उपोषणे देखील या समस्या सोडविण्यासाठी केले जातात. सध्या सांगोला शहरातहि अशा काही समस्या, प्रश्न आहेत ज्यांना नागरिक देखील कंटाळले आहेत. सांगोला शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथील पश्चिमेकडील रहिवाशी वसाहत ठिकाणी रस्ता, भुयारी गटारी व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनची सोय नाही.
संबंधित नगरपालिका प्रशासनाला याबाबत कळवून देखील मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संतप्त रहिवाशांनी डोक्यावर मैलामिश्रित सांडपाणी घेऊन नगरपालिकेच्या समोर २६ जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सांगोला शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथील पश्चिमेकडील रहिवासी नागरिकांनी रस्ता पूर्ववत सुरू करून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सांगोला तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये पूर्व वहीवाटीचा रस्ता तेथील नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने उकरून त्या ठिकाणी तार जाळी मारून रस्ता बंद केला असून याबाबत न्याय मिळवण्यासाठी लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांच्याकडे व पोलीस निरीक्षक यांच्याकडे त्याच दिवशी व इतर दिवशी निवेदन देऊन पाठपुरावा केला. तत्पूर्वी संबंधित अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने संतप्त रहिवाशांनी प्रजासत्ताक दिना दिवशी रस्ता भुयारी गटार व पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन याची सोय केली नसल्याने सर्व रहिवासी डोक्यावर महिला मिश्रित सांडपाणी घेऊन नगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहे. तरी तातडीने २५ जानेवारी अखेर न्याय द्यावा अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही असेही निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.